वैजापूर, (प्रतिनिधी) : गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सात दुकाने फोडल्याची घटना घडली. ऐन सणासुदीच्या काळात चोरट्यांनी वैजापूरला लक्ष्य केल्याने व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या चोरीच्या घटनांपैकी वैजापूर पोलीस ठाण्यात केवळ एका चोरीची नोंद करण्यात आली आहे. गोकुळ शिवाजी बावचे यांच्या संगणक दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील सात हजार रुपयांची रोख चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अनेक दुकाने फोडण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत वर्दळ वाढलेली असताना अशा घटना घडल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवकांता भुरे करीत आहेत. आला आहे. शहरात एकाच रात्री












